Dehugaon Crime News : घरासमोर पार्क केलेल्या मारूती इकोचा 25 हजारांचा सायलेन्सर चोरीला

Dehugaon Crime News : घरासमोर पार्क केलेल्या मारूती इकोचा 25 हजारांचा सायलेन्सर चोरीला


Pckhabar- घरासमोर पार्क केलेल्या मारूती इको या कारचा 25 हजार रूपये किंमतीचा 4 फूट लोखंडी सायलेन्सर अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना देहूगाव, माळवाडी येथे नुकतीच घडली.

याप्रकरणी गणेश शिवाजी परंडवाल (वय-30, रा.  राधाकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, माळवाडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांनी त्यांची मारूती इको (एमएच-14, जेए 1658) ही घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची कारचा 25 हजार रूपये किंमतीचा 4 फूट लोखंडी सायलेन्सर चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *