Pimpri News : जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी प्रहारची निदर्शने; जेवनावर बहिष्कार

Pckhabar-वेळोवेळी सूचना देऊनही महापालिका प्रशासन दिव्यांगाची कामे वेळेवर होत नाहीत, त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून निदर्शने करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम रामकृष्ण मोरे सभागृह याठिकाणी आयोजित केला होता. परंतु या ठिकाणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यामुळे एकही दिव्यांग कार्यक्रम स्थळी गेला नाही.
सर्व दिव्यांग बांधव रामकृष्ण मोरे सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जमा झाले. एकही दिव्यांग सभागृहात गेला नाही यावेळी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. प्रथमता: दिव्यांग कक्ष सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, अण्णा बोदडे यांनी येऊन दिव्यांग बांधवांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. त्यानंतर उपायुक्त अजय चारठाणकर यांनी संबंधित सर्व अधिकारी घटनास्थळी बोलावून दिव्यांगांची चर्चा करून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यापुढे कोणत्याही दिव्यांगांचे काम थांबणार नाही याची ग्वाही दिली.
त्यामुळे दिव्यांगांचे नेते मानव कांबळे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसांत सर्व काम पुर्ण करण्यासाठी मुदत दिली. महापालिकेने घेतलेल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून शुभेच्छा देऊ असे आव्हान यावेळी मानव कांबळे यांनी केले. परंतु महापालिकेचे दर्जा नसलेले जेवण कोणीही न जेवता त्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय झाला.
त्यानंतर सर्व दिव्यांग बांधव सभागृहात गेले. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता जोशी, रामचंद्र तांबे, राजाराम पाटील, रमेश भिसे, ज्ञानदेव नारखेडे, अशोक भोपळे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू विटेकर, संतोष सोनवणे, चंदन बरूवा यांच्यासह तीनशे ते चारशे अपंग उपस्थित होते.











Leave a Reply