GST News : ‘जीएसटी’ चा पाच टक्क्यांचा स्लॅब रद्द करु नये

GST News : ‘जीएसटी’ चा पाच टक्क्यांचा स्लॅब रद्द करु नये

पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजची पंतप्रधान आणि अर्थमंत्र्याकडे मागणी

Pckhabar-जीएसटीचा पाच टक्के दर रचना रद्द करुन 12 टक्के केली जाणार असल्याबाबतची चर्चा सुरु आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता असून विकास दर तीन टक्क्यांपेक्षा अधिक जाण्यासाठी इंधनाबरोबरच उद्योगांमध्ये उत्पादित होणार्‍या सर्व वस्तुंचा जीएसटी उत्पादित होणार्‍या सर्व वस्तुंचा जीएसटी यादीत समावेश करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड ऑफ चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सव्र्हिसेस अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष अ‍ॅड.अप्पासाहेब शिंदे यांनी केली आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना निवेदन पाठविले आहे. चेंबरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या एकूण 2679 वस्तुंपैकी 64 वस्तुंवर 5 टक्के दराने कर आकारणी केली जाते. करमाफी वस्तुंची संख्या 100 ते 125 एवढी आहे. तर उर्वरित 2490 वस्तुंचा 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के दर प्रणालीत समावेश आहे. मुळातच 5 टक्के दर हा मोबाइल, फुटवेअर, अगरबत्ती, खाद्यतेले, औषधे, मसाले आणि पदार्थ , शेंगदाणे, चटण्या, प्रिंटर, छपाई, सीसीटिव्ही, स्टेशनरी, सॅनेटरिज, इलेक्ट्रिक पंपस शेतीसाठीचे आणि औद्योगिक उत्पादनांचा कच्चा माल यांचा समावेश आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर कारखानदारी आता कुठे उभारी घेत असताना या मालावर कर 5 टक्क्यावरुन 12 टक्के करण्याचे नियोजन आहे. त्यामळे वाहन उद्योग आणि त्यांना सुटे भाग पुरविणार्‍या सूक्ष्म, लघु आणि मध्यम कारखानदारांना 7 टक्के दरवाढ आणि डिझेल वाढीने वाहतूक 5 टक्के वाढ असे एकूण 12 टक्के खर्च आणि भांडवली गुंतवणूक वाढणार आहे. आज मागणी अभावी वाहन उद्योग मेटाकुटीस आला आहे. त्यातच कर वाढविल्याने उद्योगांना मालाच्या किमतीत 15 टक्के दरवाढ करणे क्रमप्राप्त होणार आहे, असेही निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे.

वाहन उद्योग 5 टक्के जीएसटी भरुन कच्चा माल खरेदी करुन तयार मालावर 28 टक्के जीएसटी लादली जात असल्याने सरकारकडून एकूण 23 टक्के जीएसटी आकारला जात आहे. यात पेट्रोल आणि डिझेलवर 26 टक्के कर आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्र अडचणीत येणार आहे. उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अंदाजपत्रक सादर होण्यापूर्वीच करप्रणालीत बदल करु नये, अशी विनंती या निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *