Chikhali News : कौतुकास्पद ! भर पावसात पांडाभाऊ साने युवा मंचचे मदतकार्य

Pckhabar- बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली असताना चिखली, मोरे वस्ती भागातील विविध सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी साचले. काहींच्या घरात पाणी जाऊ लागले. दरम्यान, याबाबत स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच भाजपचे युवा नेते पांडुरंग तथा पांडा साने आणि पांडाभाऊ साने युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात सेवाकार्य करीत साचलेल्या पाण्याचा निचरा करून नागरिकांना दिलासा मिळवून दिला.
संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला काल बुधवारी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दिवसभर सुरु असलेलया पावसाने सर्वत्र पाणी साचले. चिखली मोरे वस्ती भागातही अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याची तळी निर्माण झाली होती. पावसाचा जोरही कायम होता. टॉवरलाईन भागातील कृष्णाईसह काही सोसायट्यांमध्ये रस्त्यावर मोठयाप्रमाणात पाणी साचले होते. हे पाणी रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये जाऊ लागले. याबाबत स्थानिक नागरिकांनी भाजप युवा नेते पांडाभाऊ साने यांना माहिती देऊन मदतीची याचना केली.
त्यावर क्षणाचाही विलंब न करता स्वतः पांडाभाऊ साने आणि त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी रस्त्यावर उतरले. भर पावसातही या सेवाभावी कार्यकर्त्यांनी साचलेल्या पाण्याच्या निचरा करून नागरिकांना दिलासा मिळवून दिला. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यापूर्वीही कोरोना महामारी आणि लॉकडाऊन कालावधीत मोरे वस्तीमधील नागरिकांना पांडाभाऊ साने आणि त्यांच्या पत्नी रुपाली साने मदतीचा हात दिला होता. साने यांची त्यांच्या भाडेकरूंचे लॉकडाऊन काळातील घर भाडे माफ करून नवा आदर्श निर्मण केला होता. कोल्हापूर आणि कोकणातील पुरग्रस्तांनाही त्यांनी जीवनावश्यक साहित्याची मदत केली होती.











Leave a Reply