Dehugaon Political News : देहूगावात भाजपला मोठा धक्का, आदर्श उपसरपंच स्वप्निल काळोखे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Pckhabar- आगामी देहूगाव नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव भाजपला मोठा धक्का बसला आहे. आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांनी आज (गुरूवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. उद्योजक भरत काळोखे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने काळोखे यांचा प्रवेश झाला. यावेळी देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश हगवणे,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे उपाध्यक्ष योगेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका सरचिटणीस बाळासाहेब अण्णा काळोखे, बाप्पुसाहेब मुसूडगे, प्रसिद्धी प्रमुख विशाल परदेशी, अमोल काळोखे, रोहित काळोखे, योगेश काळोखे, सागर भसे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.











Leave a Reply