Mumbai News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Mumbai News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज


Pckhabar- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे असे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी अधिकृतरित्या सांगितले.

मानेचे स्नायू आणि पाठीच्या मणक्याच्या त्रासामुळे ते १० नोव्हेंबरला रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. तेव्हापासून ते रुग्णालयातच होते. अखेर आज सकाळी १०:४५ च्या सुमारास त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवली. सध्या मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *