Sangvi Crime News : सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या डायरेक्टरपदी नियुक्तीचे अमिष दाखवून डॉक्टरची एक कोटींची फसवणूक

Sangvi Crime News : सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या डायरेक्टरपदी नियुक्तीचे अमिष दाखवून डॉक्टरची एक कोटींची फसवणूक

Pckhabar- महाराष्ट्र राज्याच्या सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या डायरेक्टरपदी नियुक्तीचे अमिष दाखवून सांगवीतील एका डॉक्टरची मंत्रालयातील एका अधिकाऱ्यासह चार जणांनी एक कोटी 6 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा धक्कादायक प्रकार 20 सप्टेंबर 2020 ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मुंबई, पुणे येथे घडला.

याप्रकरणी डॉ. आदित्य दगडू पतकराव (वय -36, रा. कल्पतरू सोसायटी फेज-2, जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विकास शिंदे (रा. पनवेल, नवी मुंबई), राजाराम शिर्के (कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई), श्रेया चौहान (रा. विकोळी मुंबई), अजित दुबे (रा. नवी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपींनी फिर्यादी यांना महाराष्ट्र राज्याच्या सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या डायरेक्टरपदी नियुक्तीचे अमिष दाखविले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी 1 कोटी 6 लाख रूपये घेतले. भारत सरकारच्या मुद्रा चुकीच्या आणि बनावट पध्दतीने वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *