Pimpri News : कन्या विद्यालयात संविधान दिन साजरा

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज (शुक्रवार) संविधान दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे व सन्माननीय पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील यांचे हस्ते संपन्न झाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. शारदा शेटे यांनी व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र, समता, बंधुता व न्याय या भारतीय लोकशाहीच्या स्तंभावर आधारित राज्य घटनेचे लेखन करून ती देशाप्रती अर्पण केली. असे मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी विद्यालयातील विद्यार्थीनी व उपस्थित अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांनी एकत्र मिळून संविधानाचे वाचन केले.
यानंतर विद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे उपशिक्षक श्री. राजाराम राऊत यांनी संविधानाची रचना , संविधान तयार करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला अभ्यास व घेतलेले कष्ट , सार्वभौम लोकतंत्र गणराज्य , धर्मनिरपेक्ष राज्य याविषयी माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मीनल साकोरे यांनी केले . व आभार प्रदर्शन विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील यांनी व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.











Leave a Reply