Dehugaon Political News : नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छूकांच्या उद्या मुलाखती

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायत निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या (शनिवार) कार्यकर्त्यांची बैठक आणि इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
देहूगाव येथील गाथा मंदिर रोड, अभंग मंगल कार्यालयात दुपारी 1 वाजता कार्यकत्यार्ंची बैठक आणि इच्छूकांच्या मुलाखती होणार आहेत. यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारख़ान्याचे उपाध्यक्ष, नगरसेवक बापूसाहेब भेगडे आदी उपस्थित असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून अर्ज घेऊन भरून द्यावेत, असे आवाहन देहूगाव राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी केले आहे.
दरम्यान, देहूगाव नगरपंचायतचे मतदान 21 डिसेंबर रोजी होणार आहे. 1 ते 7 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.











Leave a Reply