
Indrayani Namami Article :
’नमामी इंद्रायणी’साठी धडपडणारा पर्यावरण प्रेमी आमदार महेशदादा लांडगे!
Pimpri- Chinchwad ‘समस्त वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे लाखो भाविक वारीनिमित्त देहूगाव आणि आळंदीमध्ये येतात. त्यांच्या सोयीसाठी इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ बनविण्यासाठी ‘नमामी इंद्रायणी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांनी हाती घेतला आहे. इंद्रायणीच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी आमदार लांडगे यांनी नागरिकांमध्ये जनजागृती, रिव्हर सायक्लोथॉन आदी उपक्रम राबवत ’नमामी इंद्रायणी’साठी धडपडणारा पर्यावरण प्रेमी आमदार महेशदादा लांडगे अशी आपली ओळख निर्माण केली आहे.

इंद्रायणी नदीचे प्रदूषण पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीत जास्त आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ नदीचे उगम स्थान असून नदी पुढे भीमा नदीस मिळते. पिंपरी-चिंचवड शहराच्या तळवडेपासून चर्होलीपर्यंत इंद्रायणीनदी वाहते. तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगाव आणि आळंदीतून वाहणार्या इंद्रायणीकडे तर पहावतच नव्हते. लाखो वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला, तुकाराम बीजेला देहू व आळंदीत येतात. इंद्रायणीचे ‘तीर्थ’ प्रशान करून मस्तकाला लावतात. हे पाहवत नव्हते. इंद्रायणीचा सर्वाधिक प्रदूषित भाग देहू व आळंदी दिसून येत होता. इंद्रायणीच्या चिखली ते आळंदी या 18 किलोमीटपर्यंतच्या पात्रामध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदी प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी नदीपात्रामध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडळगाव, वडमुखवाडी, चर्होली, आळंदी, मोई आदी परिसरातील दूषित सांडपाणी, उद्योगधंद्यातून निर्माण झालेले सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. इंद्रायणी नदीचे हे भयानक वास्तव पाहून आमदार महेशदादा लांडगे यांनी इंद्रायणी नदीला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पुढाकार घेतला.
व्हिजन 20-20 अंतर्गत ’नमामी इंद्रायणी’ या नदी सुधार प्रकल्पाला आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंजुरी दिली. त्यानंतर 19 सप्टेंबर 2019 रोजी इंद्रायणी काठी नदीपूजन करून ’नमामी इंद्रायणी’ या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. इंद्रायणी नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि ‘नमामी इंद्रायणी’ हा जगातील सुंदर असा प्रकल्प व्हावा, यासाठी आमदार महेशदादा सातत्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. समर्थ रामदासांनी आपल्या मनाच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ या प्रश्नाचे उत्तर शोधले तर वारकरी हा जगातील सर्वात सुखी माणूस असल्याचा प्रत्यय येईल. त्यामुळे वारकरी बनून ईश्वरभक्ती केली पाहिजे, या उक्तीप्रमाणे आमदार महेशदादा यांनी पवित्र अशा इंद्रायणी नदीला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी एक मोठी चळवळ उभी करून इंद्रायणी नदीचे पावित्र्य टिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने नदीचे पावित्र्य जपण्यासाठी, तसेच इंद्रायणी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी एक पाऊल भावी पिढीसाठीचा संदेश देत इंद्रायणी नदी उगम ते संगम प्रदूषणमुक्तीसाठी इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली. यासाठी अविरत श्रमदान, सायकलमित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनने पुढाकार घेतला होता. गेल्या तीन वर्षांपासून जनजागृतीसाठी ’रिव्हर सायक्लोथॉन’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये सायकल रॅली, मानवी साखळी, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, श्रमदान, देहू ते आळंदी या दरम्यान इंद्रायणी नदी स्वच्छता मोहीम राबविली आहे. या अभियानाच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पाणी अडवा-पाणी जिरवा, पशुपक्ष्यांचे संवर्धन करणे, पक्ष्यालय सुरू करणे, उत्सव काळात निर्माल्य व मूर्ती नदीत टाकू नये यासाठी समाज प्रबोधन, आठवड्यातून एक दिवस इंद्रायणी नदी परिसरात श्रमदान आदी विविध पर्यावरणपूरक उपक्रम आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने राबविले आहेत.
यंदा आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त 28 नोव्हेंबर रोजी भारतातील सर्वात मोठे रिव्हर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आले आहे. या सायक्लोथॉनमध्ये इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने ‘रिव्हर सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, आमदार महेशदादा लांडगे यांचा 27 नोव्हेंबर रोजी वाढदिस आहे. गतवर्षी कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे महेशदादांनी वाढदिवस साजरा केला नव्हता. सामाजिक बांधिलकी जोपासत दादांनी वाढदिवसाचे औचित्य साधून गोर-गरिब नागरिकांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची मदत केली होती. कोरोना काळात शेकडो रूग्णांना वेळेवर बेड उपलब्ध करून दिले. प्लाझ्मा दानसाठी जनजागृती केली. अनेक रूग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य करणार्या डॉक्टर, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्था, महापालिका अधिकारी, कर्मचार्यांचा ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मान केला होता. असे विविध उपक्रम राबवत 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करणार्या दमदार आमदार महेशदादा लांडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!








Leave a Reply