Bhosari Crime News : बेकायदेशीर वाळू उपसा, विक्री करणार्या सात जणांवर गुन्हा
चौघांना अटक, 76 लाखांचा ऐवज जप्त

Pckhabar-बेकायदेशीरपणे शिरूर तालुक्यातील घोड नदी पात्रामधील वाळू उपसा करून पिंपरी-चिंचवड शहरात विक्रीसाठी आणणार्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी तीन वाजता मोशीतील इंद्रायणी नदी काठी समोर आला. आरोपींकडून 19 ब्रास वाळू, चार ट्रक असे 76 लाख 52 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार नितीन माणिकराव लोंढे यांन एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नवनाथ गोविंद सस्ते (वय-41, रा. सस्तेवाडी, मोशी), लखन चंद्रकांत राठोड (वय-27), सतिश अजिनाथ जाधव (वय-26, दोघेही रा. शिवाजीवाडी मोशी), रमेश नामदेव घनवट (वय-41, रा. सरदवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून अजित गोविं सस्ते (वय-38, रा. पाईट), चेतन वाखारे (वय-28, रा. शिरूर), नितीन टेकाळे (वय-36, रा. मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महसूल विभागाची परवानगी न घेता शिरूर तालुक्यातील घोडनदी पात्रातील वाळूचा बेकायदेशीर उपसा केला. हा वाळू मोशीतील आरोपी नवनाथ सस्ते याच्या जागेत आणून टाकली. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मोशीतील इंद्रायणी नदी काठावरून 1 लाख 52 हजारांची 19 ब्रास वाळू, 75 लाख रूपयांचे चार ट्रक असे 76 लाख 52 हजारांचा ऐवज जप्त केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply