Dehugaon News : कन्या विद्यालयातील 1994- 95 बॅचच्या विद्यार्थिनी शाळेच्या आठवणीत रममाण!

Dehugaon News : कन्या विद्यालयातील 1994- 95 बॅचच्या विद्यार्थिनी शाळेच्या आठवणीत रममाण!

संस्मरणीय स्नेहमेळावा उत्स्फूर्तपणे साजरा

Pckhabar- श्री क्षेत्र देहूगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात सन 1994- 95 च्या एस.एस.सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींनी स्नेहमेळाव्याचे नुकतेच आयोजन केले होते. या स्नेह मेळाव्यात सर्व विद्यार्थिनी शाळेच्या आठवणीत रममाण झाल्या होत्या.

सध्याचे मानवी जीवन अत्यंत धकाधकीचे बनले आहे .कोरोनाच्या दहशतीने एकूणच जीवनशैली बदलून गेली. अशा पार्श्वभूमीवर या 1994 -95 च्या आजच्या मुलींनी एक क्रांतिकारक पाऊल उचलले व अत्यंत हृदयस्थ जाणिवेतून स्नेहमेळाव्याचे नेटके नियोजन केले व ते लीलया पूर्णत्वास नेले .
रोजच्या ताण-तणावाच्या वातावरणापासून थोडे दूर जाऊन ,क्षमैत्रिणींसोबत वेळ व्यतीत करून, आनंदाने रममाण होऊन, एकमेकींच्या सुखदुःखादी भावनांची देवाणघेवाण करून, बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन पुन्हा मोठ्या जोमाने आपल्या व्यावहारिक, प्रापंचिक जीवनामध्ये गेल्या.

कार्यक्रमाच्या दिवशी प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. कित्येक वर्षानंतर भेटल्याचा आनंद दिसत होता. कार्यक्रमासाठी अभंग मंगल कार्यालयाच्या कार्यालयाचा हॉल विनामूल्य देऊन त्यांच्याच बॅच़च्या गणेश काळोखे यांनी उपकृत केले .त्यांचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापिका सुजाता आनंदराव मंडले या आवर्जून उपस्थित होत्या. तसेच त्या तत्कालीन सर्व शिक्षक श्रीयुत मिरजकर सर, वाले सर, कदम सर ,घुले सर , शेख सर कुंभार सर ,सौ. आरगडे मॅडम , पासलकर मॅडम, कुंभार मॅडम, चिखले मॅडम, दळवी मॅडम हेही सर्वजण उपस्थित होते.

मुलींनी या सर्वांचा यथोचित असा सत्कारही केला. शिवाय एक सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यालयात पंचवीस हजार शंभर रुपये देणगी ही देऊन उतराई झाल्या. या सर्वांचे शाळेच्या वतीने श्रीमती कुंभार मॅडम यांनी कौतुकही केले व धन्यवाद दिले . अशा प्रकारे हा आनंद सोहळा अत्यंत दिमाखदारपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *