Pimpri political News : शिवसेनेची किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, काळे झेंडे दाखविले

शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने सामने
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचार प्रकरणाचे निवेदन देण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांचे निवेदन न स्विकारताच सोमय्या गेल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसर्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते ‘भाजप जिंदाबाद, ‘किरीट सोमय्या जिंदाबाद, भारत माता की जय’ च्या घोषणा देत होते. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज (रविवार) शहरात भाजप नगरसेवक, पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुखांशी संवाद साधण्यासाठी शहर भाजपच्या कार्यालयात आले होते. मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
सोमय्या हे भाजप कार्यालयातून निघून पुढील कार्यक्रमासाठी जात असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन देण्यासाठी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांना बाजूला लोटत सोमय्या यांच्या गाडीला वाट मोकळी करून दिली. संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत ‘किरीट सोमय्या हाय-हाय’ ‘या सोमय्याच करायच काय? खाली डोक वर पाय’ ‘शिवसेना जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली. तर यालाच प्रतिउत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी भाजपा जिंदाबाद, ‘भारत माता कि जय’, ‘किरीट सोमय्या जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.
या आंदोलनात शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, शिरूर लोकसभा मतदार संघाच्या महिला संघटिका सुलभा ऊबाळे, योगेश बाबर, ऍड उर्मिला काळभोर, सचिन सानप, रोमी संधू, अनिता तुतारे, वैशाली मराठे, सेनेचे विभागप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Leave a Reply