Chikhali Crime News : शिव्या दिल्यामुळे दारू विक्रेत्याचा खून

Chikhali Crime News : शिव्या दिल्यामुळे दारू विक्रेत्याचा खून


Pckhabar- शिव्या दिल्यामुळे एका दारूड्याने दारू विक्रेत्याला हाताबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड मारून खून केला. ही घटना चिखलीतील भिमशक्तीनगर येथे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

मनोहर गलाप्पा डोंगरे (वय-55, रा. भिमशक्तीनगर, चिखली) असे खून झालेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा सुनिल मनोहर डोंगरे (वय-24) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आशिष गवळी (रा. भिमशक्तीनगर झोपडपट्टी मोरेवस्ती चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर डोंगरे यांचा भिमशक्तीनगर येथे दारु विक्रीचा धंदा होता. डोंगरे यांनी दारू दारू पिण्यासाठी आलेल्या आशिष गवळी याला शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून आरोपीने शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात पाठीमागील बाजुला दगड मारून मनोहर डोंगरे यांचा खून केला.

चिखली पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *