
Talegaon Dabhade News :
मधुमेह तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar-नागरिक मंच तळेगाव दाभाडे, नगरसेवक निखिल भगत, डॉ. नेहा कुलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 128 नागरिकांनी तपासणी करून घेतली.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त गुरूवारी येथील ताई आपटे प्रतिष्ठान हॉलमधे मधुमेहाशी संबंधित विविध तपासण्या, रक्तातील साखर तपासून योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आलेल्या सर्व नागरिकांना बी व डी व्हिटॅमिनच्या गोळ्या मोफत देण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक निखील भगत, डॉ.नेहा कुलकर्णी, निरंजन जहागीरदार आदी मान्यवर उपस्थित होते.











Leave a Reply