Maval Crime News : उपसरपंच पदावरून बाप-लेकाची एकाला मारहाण


Maval Crime News : उपसरपंच पदावरून बाप-लेकाची एकाला मारहाण

Pckhabar-उपसरपंच पदाचा ठरल्याप्रमाणे राजीनाम देण्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे तिघा बाप-लेकांनी एकाला शिवीगाळ करून हाताने, दांडक्याने जबर मारहाण केली. ही घटना मावळातील उर्से ग्रामपंचायत समोर बुधवारी घडली.

सुलतान महामुद मुलानी (वय-46, रा. उर्से) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी शिरगाव पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. त्यानुसार किरण शंकर राऊत (वय-35), पवन शंकर राऊत (वय-33), शंकर खंडू राऊत (वय-60, सर्व रा. उर्से) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्से ग्रामपंचायतमधील उपसरपंच पदाचा ठरल्याप्रमाणे राजीनामा देण्याच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाला. आरोपी पवन राऊत याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत असतानाच किरण आणि शंकर तेथे पळत आले. किरण याने फिर्यादींना दांडक्याने जबर मारहाण केली. यामध्ये त्यांचा हात मोडला. किरण आणि शंकर यांनी फिर्यादीच्या घरातील सदस्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. सहायक पोलीस फौजदार जगदाळे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *