Talegaon Dabhade News : नगरपरिषदेचे 14 प्रभाग, 28 नगरसेवक संख्या निश्चित!

Talegaon Dabhade News : नगरपरिषदेचे 14 प्रभाग, 28 नगरसेवक संख्या निश्चित!

Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी 14 प्रभाग झाले असून 28 नगरसेवक संख्या निश्चित झाली आहे. त्यामुळे इच्छूक  तयारीला लागले आहेत.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेची  14 डिसेंबर 2016 मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यावेळी नगर परिषद ‘क’ वर्गात होती. त्यामध्ये एकूएकूण 13 प्रभाग होते. यामध्ये 26 नगरसेवक होते. नगराध्यक्षा थेट जनतेतून  निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासह एकूण नगरसेवकांची संख्या 27 झाली होती.

सध्या नगरपरिषद हि ‘ब’ वर्गात समाविष्ट झालेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकषानुसार नगरसेवकांच्या संख्येत बदल होणार आहे. ‘ब’ वर्ग नगर परिषदेसाठी 40 हजार लोकसंख्येला 25 नगरसेवक तर पुढील प्रत्येक 5 हजार लोकसंख्येसाठी 1 नगरसेवक राहणार आहे. सध्या 2011 च्या जनगननेनुसार तळेगाव शहराची लोकसंख्या 56 हजार 416 आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी फक्त 3 सदस्य संख्येत वाढ होईल. त्यामुळे एकूण सदस्य सख्या 28 राहील. राज्य शासनाने नगर परिषदेच्या निवडणुका 2 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे असे घोषित केले आहे. त्यामुळे 28 नगरसेवकांच्या संख्येमुळे 14 प्रभाग राहतील. मागच्या निवडणुकीत 13 प्रभाग होते. यावेळी 14 प्रभाग होतील.  1 प्रभाग वाढल्याने सर्वच प्रभागाची रचना नव्याने करावी लागणार आहे. नवीन होणार्‍या प्रभाग रचनेकडे सर्व राजकीय पक्षाचे व इच्छूकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *