
Bhosari News : वारंवार खंडीत होणार्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर मोर्चा
Pckhabar- भोसरी चक्रपाणी वसाहत, राम मंदिर परिसर, महादेव नगर, देवकर वसाहत, शंभूराजे कॉलनी, पांडव नगर, कॉलनी अशा भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. ऐन दिवाळी सणामध्येही वीज गायब होती. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रार देऊनही अधिकारी दुर्लक्ष करत होते, याच्या निषेधार्थ गुरूवारी नगरसेवक रवि लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढून निषेध केला.
भोसरीतील गावजत्रा मैदानातून हा मोर्चा महावितण कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चा महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
याबाबत रवि लांडगे म्हणाले, भोसरी चक्रपाणी वसाहत, राम मंदिर परिसर, महादेव नगर, देवकर वसाहत, शंभूराजे कॉलनी, पांडव नगर, कॉलनी अशा भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. ऐन दिवाळी सणामध्येही वीज गायब होती. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रार देऊनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरण अधिकार्यांना वारंवार विनंती केली. मात्र, त्यानंतरही वीज पुरवठा खंडीत होत होता. याच्या निषेध निषेध मोर्चा काढण्यात आला होता.











Leave a Reply