Wakad Crime News : पहिले लग्न झाले असताना तरूणाने केले दुसरे लग्न; आरोपी गजाआड

Pckhabar- मनाविरूध्द लग्न केल्यामुळे पहिल्या पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करून दुसर्या महिलेबरोबर लग्न करणार्या पतीसह सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2013 ते 17 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वाकड येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
शिशिरकुमार रविंद्रप्रसाद सिन्हा (वय-36) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर सासरे रविंद्रप्रसाद सिन्हा (वय-60, दोघे रा. सी 303, मॉन्टवर्ड सेवल सोसायटी, वाकड), दिर अनिश कुमार रविंद्रप्रसाद सिन्हा (वय-38, रा. ग्रेटर नोयडा), दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 34 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिशिरकुमार याचा फिर्यादीसोबत विवाह झाला होता. मात्र, हा विवाह त्याच्या मनाविरूध्द झाल्यामुळे त्याने फिर्यादी यांचा वारंवार शिवीगाळ, मारहाण करून शारिरीक आणि मानसिक छळ केला. घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला. तसेच दुसर्या महिलेशी लग्न केले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी या आरोपींच्या घरी गेल्या असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ, मारहाण करून घरामध्ये न घेता हाकलून दिले. वाकड पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply