Ravet Crime News : व्यवसाय चालविण्यासाठी दिला अन् चालकाने सेटअपच विकून टाकला!

Ravet Crime News : व्यवसाय चालविण्यासाठी दिला अन् चालकाने सेटअपच विकून टाकला


Pckhabar- एसीजी गेमींग झोनचा व्यवसाय चार जणांनी एकाला चालविण्यासाठी दिले असताना त्याने व्यवसायाचा सर्व सेटअपच विकून टाकून चार जणांची सव्वा तीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार रावेत येथे नुकताच उघडकीस आला.

अर्जुन लक्ष्मण उईके असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.  याप्रकरणी चिन्मय अजितकुमार बोराडे (वय-26, रा. चिंचवड) यांनी रावेत चौकीत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोराडे यांनी त्यांचे मित्र पुष्कर थिटे, तृप्ती नलावडे, ओंकार राजगुरू यांनी मिळून रावेतमध्ये एसीजी गेमींग झोनचा व्यवसाय सुरू केला होता. फिर्यादी यांनी गेमींगचा व्यवसाय चालविण्यासाठी आरोपी उईके याला दिला होता. आरोपीने कॉम्युटर, स्कुनर, टेबल, प्ले स्टेशन, सिडी असे 3 लाख 37 हजारांचे साहित्य विकून अपहार केला. रावेत पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *