Pune District News मनीषा परांडे यांचा कोविड योद्धा पुरस्काराने गौरव

Pune District News मनीषा परांडे यांचा कोविड योद्धा पुरस्काराने गौरव


Pckhabar-शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या हवेली तालुका समन्वयक मनीषा परांडे यांच्या कोरोना महामारीच्या काळात केलेल्या जनसेवेची दखल घेत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने त्यांचा कोविड योद्धा पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे ठाण्यातील काशीराम घाणेकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात   कक्षाचे  पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजाभाऊ भिलारे यांच्या हस्ते परांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  मंत्री एकनाथ शिंदे, खासदार  श्रीकांत शिंदे,  शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील, डॉ.  डि.  वाय.  पाटील रुग्णालयातील  वैद्यकीय मदत कक्षप्रमुख  मंगेश चिवटे,  ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख जितेंद्र सातव  आदी उपस्थित होते. कोरोना संकट काळात परांडे यांनी कोरोनबाधित रुग्णांसाठी प्लाझ्मा  मिळवून देणे,  रुग्णालयातील वाढीव  बील कमी करणे, आँक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका उपलब्ध करून  रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना मोठा आधार दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *