Talegaon Dabhade News : तळेगावात मोफत मधुमेह तपासणी, मार्गदर्शन शिबिर

Pckhabar- जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून नागरिक मंच तळेगाव दाभाडे, नगरसेवक निखील भगत आणि डॉ. नेहा कुलकर्णी यांच्या योगीराज क्लिनीकतर्फे तळेगावात (दि. 18 नोव्हेंबर) गुरूवारी मोफत मधुमेह तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर तळेगाव दाभाडे, यशवंतनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ताई आपटे प्रतिष्ठान, सरस्वती परिवार येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे.
या शिबीराची माहिती देताना नगरसेवक निखीत भगत म्हणाले’’ बदलत्या जीवनशैलीमुळे धुमेहाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा वजन जास्त असेल तर मधुमेहाची जास्त शक्यता असते. मधुमेहावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी लवकर निदान होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने यशवंत नगर व तपोधाम कॉलनी परिसरातील 50 वर्षांपुढील रहिवाश्यांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक भगत यांनी केले आहे’’.











Leave a Reply