Dehugaon News :  नगरपंचायतची प्रभाग रचना भोगौलिक आणि सामाजिक दृष्ट्या चुकीची; भाजपची हरकत

Dehugaon News :  नगरपंचायतची प्रभाग रचना भोगौलिक आणि सामाजिक दृष्ट्या चुकीची; भाजपची हरकत

Pckhabar-श्रीक्षेत्र देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेली प्रभाग रचना भोगौलिक आणि सामाजिक दृष्ट्या चुकीची करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवार राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी सुर उमटला आहे.  भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणुक आयोगचा वतीने ज्या प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीची जी क्लिष्ट रचना निर्माण करण्यात आली आहे त्याचा जाहीर निषेध केला आहे.

याबाबत देहू शहर भाजपच्या वतीने प्रशासनास निषेधात्मक निवेदन नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ लिपिक महेश वाळके, ज्ञानेश्वर निकम यांना देण्यात आले.  याप्रसंगी देहू शहर भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र पांडुरंग परंडवाल, प्रकाश उर्फ रायबा मोरे कार्याध्यक्ष देहू भाजप, संदिप भाऊ परंडवाल अध्यक्ष ओबीसी आघाडी, सोनाली घोडेकर राष्ट्रीय सचिव पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार मंच, सरचिटणीस सागर मुसूडगे, पुजा माळी उपस्थित होते.

देहूगाव नगरपंचायतच्या सार्वजनिक 2021-2022 निवडणुकीसाठी शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयाच्या दालनात प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.
सदर कार्यक्रमास देहुतील प्रमुख राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आणि बहुसंख्येने नागरीक उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *