Talegaon Dabhade Crime News : ’तीन पत्ती’वरून मित्राचा चाकूने भोकसून खून

Pckhabar-तीन पत्ती खेळताना खेळाच्या नियमावरून दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाने त्याच्या दोन मेहूण्यांना बोलावून तरुणाला चाकूने भोकसून खून केला. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मावळातील इंदोरी येथे घडली.
शाबुद्दीन अन्सारी (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रियाज निसार अन्सारी (वय 23, रा. इंदोरी, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जलाल शेख, मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्राईल अन्सारी (तिघे रा. इंदोरी, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रियाज, मयत शाबुद्दीन, अब्दुल हनान अन्सारी आणि आरोपी जलाल हे चौघे तळेगाव दाभाडे जवळील, इंदोरी येथे एकाच खोलीत भाड्याने राहतात. शनिवारी रात्री ते तीन पत्ती खेळत होते. तीन पत्ती खेळाच्या नियमावरून शाबुद्दीन आणि जलाल शेख यांच्यात वाद झाला. त्यानंतर जलाल शेख त्याच्या घरी गेला. तो त्याच्या दोन मेहुण्यांसोबत चाकू घेऊन परत फिर्यादी यांच्या खोलीत आला. तिघांनी मिळून शाबुद्दीनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्राईल अन्सारी या दोघांनी शाबुद्दीनला घट्ट पकडले. तर जलाल याने शाबुद्दीनच्या छातीवर, पोटावर, डोळ्याजवळ चाकूने भोकसून खून केला. गंभीर जखमी झालेल्या जलालचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.











Leave a Reply