Akurdi News : आकुर्डीगावात प्रथमच मोराचे दर्शन

Pckhabar- आकुर्डीतीतील जैन कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साईटच्या एका मोठ्या खोदलेल्या खड्ड्यामधील तळ्यात आज सकाळी नागरिकांना मोराचे दर्शन झाले आहे. मोर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी मोराला खाद्य पदार्थ टाकले. फोटो काढून त्याचा आनंद उपभोगला.
मोर कधी मानवी वस्ती मध्ये येत नाही. मावळ खोऱ्यातील जंगलझाडी मध्ये मोर पाहायला मिळतात. कदाचित स्थलांतर करताना देहूगाव मार्गे दुर्गादेवी टेकडी येथे हा मोर वाट चुकून पाण्याच्या आणि खाण्याच्या शोधत हा मोर आकुर्डीत आला असावा.
आकुर्डीतील ऍड.रमेश महाजन यांनी त्यांच्या घरातून या मोराचे घेतलेले छायाचित्र अतिशय मनमोहक आहे.











Ashok Khot
दोन वर्षा पुर्वी कुदळवाडीत माझ्या फ्लॕटच्या बाल्कनी च्या कबठड्यावर येऊन बसला होता. मी जवळ गेल्यावर उडून गेला.