Talegaon Dabhade Crime News : घरफोडीत सोन्याची बिस्कीटे चोरीला

Pckhabar- बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याची बिस्कीटे, रोख रक्कम असा 5 लाख 30 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मावळातील वारंगवाडी येथे दि. 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत घडली.
यशवंत बळवंत गद्रे (वय-72, रा. वारंगवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे घर दि. 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत कुलूप लावून बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 10 तोळे वजनाचे सोन्याची बिस्कीटे, रोख रक्कम असा 5 लाख 30 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply