Dehugaon News : माई बालभवन येथील दिव्यांग, अनाथ मुलांसाठी 15 पेन ड्राईव्ह व किराणा साहित्य भेट


Dehugaon News : माई बालभवन येथील दिव्यांग, अनाथ मुलांसाठी 15 पेन ड्राईव्ह व किराणा साहित्य भेट

मनोज पांडुरंग कंद यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

Pckhabar-माई बालभवन, मामुर्डी येथे कट्टा मित्र मंडळाचे सदस्य लोरियल कंपनी चे युनियन लीडर मनोज पांडुरंग कंद यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी त्यांच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन 34 जीबी डाटा संकलित करणारे 15 पेन ड्राईव्ह व दैनंदिन आवश्यक किराणा साहित्य देण्यात आले.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत असताना या संस्थेतील विद्यार्थिनी देवीका हिने आम्हाला अभ्यासासाठी ब्रेल लिपीची पुस्तके यातून व रेकॉर्डिंग च्या माध्यमातून श्रवण करून अभ्यास करावा लागतो. महत्त्वाचा अभ्यास रेकॉर्डिंग च्या माध्यमाने पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. अशावेळी पेन ड्राईव्ह असणे महत्त्वाचे ठरते. यामध्ये आवश्यक माहिती असणारा डाटा ऐकण्यासाठी आम्ही सेव करू शकतो. त्यामुळे आपण दिलेली ही भेट आमच्यासाठी खूप अनमोल आहे. आपण आमच्या संस्थेला वेळोवेळी भेट देऊन जे सहकार्य करतात याविषयी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तिने धन्यवाद व समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी अभंग प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सागर मोरे , प्राध्यापक विक्रम भोईटे, अजिंक्य साकोरे, मच्छिंद्र चव्हाण, नरेंद्र सहाय , प्रीतम कंद, विकास कंद, सुशांत मगदूम उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे प्रमुख मधुकर इंगळे यांनी आभार मानताना, संस्थेच्या प्रमुख असणाऱ्या माईंचे मागील महिन्यात निधन झाल्यामुळे माईंनी दिलेला समाजसेवेचा विचार व उभे केलेले हे समाजकार्य आपणा सर्वांच्या सहकार्याने आता पुढे घेऊन जायचे आहे. माईं च्या आठवणी सांगताना त्यांचे मन गहिवरून आले होते… असे उपक्रम निश्चित पणाने आमच्या कार्याला प्रेरणा देणारे आहेत अशीही भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *