Bhosari crime news : रोड कुठे जात आहे, असे विचारण्याचा बहाणा करून महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

Pckhabar-पाळीव श्वानाला फिरून घरी जाणार्या महिलेने पाठीमागून आलेल्या एकाने रोड कुठे जात आहे, असे विचारून महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि चैन हिसकावून पळ काढला. ही घटना बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडली.
एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला बुधवारी रात्री पाळीव श्वानाला फिरून घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एकाने फिर्यादी यांना रोड कुठे जात आहे, असे विचारून त्यांचे लक्ष वेधले. याचवेळी भामट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि सौन्याची चैन असा 55 हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.











Leave a Reply