Talegaon Dabhade crime news : तुझा पायगुण चांगला नाही म्हणत विवाहितेचा छळ

Talegaon Dabhade crime news : तुझा पायगुण चांगला नाही म्हणत विवाहितेचा छळ


Pckhabar- तु माझ्या बाळाला खल्लास केेले, तुझा पायगुण निट नाही, तुला काहीच काम येत नाही, तुझे बाहेर अफेअर सुरू आहे, असे म्हणत पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वराळे येथे नुकतीच उघडकीस आली आहे.
याप्रकरणी विवाहितेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार जीत प्रसाद कैलास (वय-32, रा. वराळेगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पती-पत्नी आहेत.  आरोपीने फिर्यादी यांना  तु माझ्या बाळाला खल्लास केेले, तुझा पायगुण निट नाही, तुला काहीच काम येत नाही, तुझे बाहेर अफेअर सुरू आहे, असे म्हणत शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *