Dighi Crime News : टॉर्चरकरून वकिलाकडे मागितली 20 लाखांची खंडणी, तिघांवर गुन्हा  

Dighi Crime News : टॉर्चरकरून वकिलाकडे मागितली 20 लाखांची खंडणी, तिघांवर गुन्हा


Pckhabar-तिघांनी मिळून एका वकीला टॉर्चरकरून वीस लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार दिघी येथे उघडकीस आला आहे.  हा प्रकार मे 2019  ते 9 नोव्हेंबर 2021 या कालावधीत चर्‍होली आणि आळंदी परिसरात घडला.
किसन तापकीर, सतीश तळेकर, लक्ष्मीकांत रासकर (तिघे रा. वडमुखवाडी, चर्‍होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वकील कैलास विनायक तोंडे (वय 29, रा. वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकील आहेत. ते 2016 पासून चर्‍होली परिसरात फ्लॅट घेऊन विक्री करण्याचा व्यवसाय करतात.  2017 मध्ये फिर्यादी यांची लक्ष्मीकांत रासकर यांच्यामुळे किसन ज्ञानोबा तापकीर यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी फिर्यादी यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू होतात. परंतु 2019 मध्ये किसन तापकीर यांच्याशी किरकोळ कारणावरून फिर्यादी यांचा वाद झाला. त्यानंतर प्रकाश म्हस्के यांच्या प्लॉटचा व्यवहार करत असताना त्यांनी पेपर नोटीस देण्यास सांगितली. फिर्यादी यांनी ऑफिसच्या सहकार्‍यामार्फत पेपर नोटीस दिली. फ्लॅटच्या उद्घाटनाला आरोपींना बोलावले नाही. त्याचा राग मनात धरून किसन तापकीर यांनी फिर्यादी यांना पैशांसाठी टॉर्चर करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी त्यांच्या मित्रांसोबत भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला. त्यामुळे आरोपी किसन तापकीर यांना पैसे मिळणे बंद झाले होते. त्यामुळे ते फिर्यादी यांना टॉर्चर करत होते. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आरोपी किसन तापकीर यांनी फिर्यादी यांना फोन करून आळंदी देहूफाटा या ठिकाणी एका हॉटेलवर बोलावून घेतले.   आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच हाताने मारहाण केली. तू ऑफिस कसे उघडतो अशी धमकी दिली. पाच गुंठे जागा माझ्या नावावर कर नाहीतर तुला व्यवसाय करू देणार नाही, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. फिर्यादी यांनी पैसे देण्यास होकार दिल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना एका तासानंतर हॉटेलच्या रूममधून सोडून दिले. फौजदार एस. बी. दरेकर तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *