Pimpri News : ‘प्लॅगोथॉन’ मोहिमेसाठी उद्या आढावा बैठक

Pimpri News : ‘प्लॅगोथॉन’ मोहिमेसाठी उद्या आढावा बैठक

Pckhabar-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृती करीता प्लॅगोथॉन मोहिम २१ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.   आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत उद्या (बुधवार) चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृह येथे सकाळी १०.३० वाजता आढावा बैठक आयोजित केली आहे.

   
या बैठकीस क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, एजी-बीव्हीजी संस्था, ठेकेदार, एजन्सी, गृहनिर्माण संस्था, हॉटेल असोसिएशन यांचे प्रतिनिधी तसेच कलाकार, खेळाडू यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाचे उप आयुक्त संदीप खोत यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *