
Nigdi News : भक्ती शक्ती परिसर 15 हजार दिव्यांनी उजळून निघाला
दिवंगत महापौर मधुकरराव पवळे प्रतिष्ठनचा उपक्रम
Pckhabar-दिवंगत महापौर मधुकरराव पवळे प्रीतिष्ठानच्या वतीने भक्ती शक्ती येथील जगद्गुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे शिल्प निगडी या ठिकाणी दिवंगत महापौर मधुकरराव पवळे यांच्या संकल्पनेतून उभे केले. त्या ठिकाणी प्रतिष्ठनचा वतीने १५ हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला ,व सगळा परिसर उजळून निघाला.
दीपमहोत्सवाचे हे २० वे वर्ष असून याठिकाणी प्रत्येकवर्षी हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे यांनी सांगितले. कोरोनामुळे मागील एक वर्ष खंडित झाल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.
चिंचवड विधानसभाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. व उपस्थित नागरिकांनी क्षणात सगळ्या परिसरात दीप लावून सगळा परिसर उजळून निघाला.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे , जेष्ठ नगरसेविका सुमन पवळे, क्रीडा, साहित्य सांस्कृतिक सभापती प्रा. उत्तम केंदळे, नगरसेवक रवी लांडगे, अमित गावडे, नगरसेविका अश्विनी बोबडे, कमल घोलप, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, आप्पा बागल, कान्हे चे सरपंच विजय सातकर, राष्ट्रवादी विद्यार्थी पिंपरी चिंचवड सेलचे अध्यक्ष यश दत्ता साने, तानाजी काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
उप्रकम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याचे सुमन पवळे यांनी सांगितले.








Leave a Reply