Pune News : कुष्ठरोगबाधितांना दिवाळी भेट ; एम जे एफ लायन अशोक येवले यांचा पुढाकार

Pune News : कुष्ठरोगबाधितांना दिवाळी भेट ; एम जे एफ लायन अशोक येवले यांचा पुढाकार

Pckhabar-कोंढावा येथील ३५० कुष्ठरोगबाधित कुटुंबियांची अन्नधान्याची नितांत गरज भागविण्याची समाजसेविका श्रुतिका मुंगी आणि अपंग व कुष्ठ पुनर्वसन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीश सावंत यांच्या विनंतीवरून एम जे एफ लायन अशोक येवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते.

समाज झिडकरतो व स्वकीयही जवळ करीत नाहीत अशा परिस्थितीत ही कुटुंबे जीवन जगत आहेत.सतीश सावंत यांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी ट्रस्टची स्थापना केली असून याच कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणांना विश्वस्त म्हणून नेमले आहे.

लायन येवले यांच्या आवाहनास सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व दिवाळीत गरजूंच्या आनंदात आपला आनंद मानणाऱ्या समाज बंधू भगिनींनी एका दिवसात रु ४० हजार चे योगदान देऊन भरभरून प्रतिसाद दिला.जमा झालेल्या निधीतून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळीनिमित्त प्रत्येक कुटुंबास घरोघरी जाऊन मिठाईचे वाटप केले.त्याप्रसंगी लोकांनी व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना व त्यांचे मनापासूनचे हास्य यामुळे आम्हा सगळ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. शिल्लक राहिलेल्या रकमेतून गरजेनुसार शिधावाटप करण्यात येणार आहे.

ज्ञानदेव व वैशाली गायकवाड रु १० हजार,लायन उषा येवले व परिवार रु ५ हजार,शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास दौन्डकर ५ हजार,विवेक कवाडिया ५ हजार,सचिन तावरे ३हजार ,लायन जनार्दन गावडे २हजार,गणेश पाटील,राजेश मुनोत,सदाभाऊ कुंभार,हनुमंतराव गायकवाड,धनंजय घाटगे,अमित खत्री,सुरेश पाचारणे,सचिन पाटील,विश्वनाथ लिंगायत प्रत्येकी १ हजार यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे भाग्य आम्हास लाभले.या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत.

समाजातील दानशूरांनी श्री सतीश सावंत
मोबाईल+91 93712 35680 यांच्याशी संपर्क साधून भरघोस मदत करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे. निधी जमा करण्यासाठी बँकेचा तपशील पुढील प्रमाणे ;
Apang Leprosy Punarvasan Yuvak Sangatan Antulenagar
State Bank of India
Savings Account Number :-
33407684304
IFSC :- SBIN0014888
BRANCH :- KONDHWA NIBM UNDEI ROAD PUNE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *