Sangvi News : नटसम्राट निळू फुले यांच्या भावमुद्रांचे अनावरण

Sangvi News : नटसम्राट निळू फुले यांच्या भावमुद्रांचे अनावरण

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध चित्रकार दिवंगत नारायण बबन गायकवाड यांनी रेखाटलेल्या विविध भावमुद्रांचा अनावर समारंभ नुकताच नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे महापौर माई ढोरे आणि माजी नगरसेवक, उद्योजक शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

प्रसिद्ध चित्रकार नारायण गायकवाड यांच्या आकस्मित निधनाने एक प्रतिभावंत कलाकार पिंपरी चिंचवड शहराने गमावला ते रंगरेषांचा जादूगार होते . शासनाच्या सेवेत राहून आपल्या चित्रांमधून त्यांनी अनेक आरोग्य विषयक सामाजिक संदेश देण्याचे महान कार्य केले.

त्यांनी रेखाटलेल्या नटसम्राट निळू फुले यांच्या भावमुद्रा जगप्रसिद्ध आहेत. त्यामुळे या कलाकृतींचे जतन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच या कलाकृतींचे जतन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

या कलाकृती नेहमी समाजाला व नवोदित कलाकारांना प्रेरणा देतील. पिंपरी चिंचवड शहराने नेहमीच कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. या भावमुद्रांच्या मांडणीची संकल्पना महापौर ढोरे यांची आहे. अश्या शब्दात जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे,  कनिष्ठ अभियंता विजय कांबळे, दिलीप कांबळे, श्रीकृष्ण ढोरे, नारायण गायकवाड यांचे वडील जेष्ठ नाटककार बबन  गायकवाड, नारायण गायकवाड यांच्या पत्नी श्रीम .स्वाती गायकवाड तसेच समारंभाचे निमंत्रक नारायण गायकवाड यांचे बंधू प्रसिद्ध गायक अनिल गायकवाड आणि समस्त गायकवाड परिवार आणि कलेवर प्रेम करणारे अनेक कलाप्रेमी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप कांबळे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *