Pimpri News : अंत्योदयाच्या संकल्पनेतून अमित गोरखे यांचे कार्य

Pimpri News : अंत्योदयाच्या संकल्पनेतून अमित गोरखे यांचे कार्य

वंचित घटकांपर्यंत पोहचविले दिवाळीचे एक महिन्याचे साहित्य
Pckhabar- भाजपाचे प्रदेश चिटणीस अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभेतील गरीब विधवा व त्यांच्या घरामध्ये कोरोना काळात कुटुंबातील कर्ता पुरुष स्वर्गवासी झाला अशा वंचित घटकांपर्यंत दीपावली सुखकर जावी या उद्देशाने एक महिना पुरेल असा दीपावलीला लागणारा किराणा साहित्य 300 पेक्षा जास्त कुटुंबानं पर्यंत पोहोचविण्यात आले.

याप्रसंगी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी प्रास्ताविक केले, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे पिंपरी-चिंचवड संघटन सरचिटणीस अमोल थोरात नगरसेवक व माजी उपमहापौर केशव घोळवे नगरसेवक व माजी उपमहापौर तुषार हिंगे ,नगरसेवक बाबू नायर,उपस्थिती होते.

माननीय सदाशिव खाडे यांनी आपल्या प्रमुख भाषणात श्री अमित गोरखे यांच्या कार्याचे कौतुक केले ते म्हणाले अमित गोरखे स्वतः एका वंचित समाजाचे प्रतिनिधी व करतात व त्यांचा प्रवास काकडी विक्रेता ते शिक्षण संस्था चालक असा पूर्ण पिंपरी-चिंचवडला माहित आहे एक काकडी विकणारा वॉलपेपर टाकणारा युवक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक भान ठेवत आपल्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो व पुढे जाऊन हजारो विद्यार्थ्यांचा पालक होतो हे वाखाणण्याजोगे आहे एका सामान्य कुटुंबातील आलेला मुलगा ज्यावेळेस अंत्योदया चे काम अत्यंत प्रेरक अपने करतो व ज्या कुटुंबांना दिवाळीत मदतीची अपेक्षा आहे,अशा कुटुंबांना प्रामाणिकपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता मदत करतो हीच शिकवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची आहे. मितभाषी व अजातशत्रू असलेल्या अमित गोरखे यांचे शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे आहे, सर्व स्तरातील मंडळींना ते हवेहवेसे वाटतात यातच त्यांचा कार्यतत्पर पणा व जनसंपर्क दडलेला आहे.

संघटन सरचिटणीस अमोल थोरात म्हणाले अमित गोरखे यांनी शिक्षण संस्था संभाळत असताना आरटीई च्या माध्यमातून गेल्या सात वर्षांमध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्थेत मोफत प्रवेश देऊन शिक्षणाची गंगा गरीब कुटुंबात पर्यंत पोचवली आहे ,अशा प्रकारचे कार्य ते स्वतः त्या घटकातून आले असल्यामुळे, अत्यंत प्रामाणिकपणे करीत आहे ते माझे मित्र असल्याचा मला अभिमान आहे.


माजी महापौर केशव घोळवे, माजी महापौर तुषार हिंगे,नगरसेवक बाबू नायर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आभार श्री बी के कोकाटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *