Bhosari Crime News : बनावट रेशन कार्ड, जन्माचे दाखले बनवुन देणार्‍या दोघांना अटक

Bhosari Crime News : बनावट रेशन कार्ड, जन्माचे दाखले बनवुन देणार्‍या दोघांना अटक

बनावट प्रमाणपत्र बनवून घेणार्‍या नागरिकांवर गुन्हे दाखल करणार : पोलीस आयुक्त

Pckhabar-बनावट रेशन कार्ड, शाळेचे, जन्माचे दाखले बनवुन देणार्‍या  ई सेवा केंद्र चालकासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट शिक्के तयार करण्याचे मशिन, कॉम्प्युटर, प्रिंटर, 44 बनावट शिक्के जप्त करण्यात आले आहे. बनावट प्रमाणपत्र बनवून घेणार्‍या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राहुल विश्वांभर शिंदे (वय-41, रा. आनंदनगर, चिंचवड स्टेशन), नितीन माधव वहाळकर (वय-58, रा. दत्तवाडी, सिंहगड रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बनावट दाखल्याव्दारे विविध शासकीस संस्थाची फसवणुक होत असल्याबाबत काही तक्रारी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींचा तपास करत असताना भोसरी तपास पथकाचे फौजदार भवारी यांना एक जण बनावट शाळेचे दाखले तयार करतो अशी माहिती मिळाली.  पोलिसांनी बनावट ग्राहकामार्फत आरोपीशी संपर्क साधला. आरोपीने कोणाच्या नावाने दाखला बनवायचा याची माहिती घेवुन दाखला बनवुन बनावट ग्राहकास  दाखला घेण्यासाठी कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ बोलावले.

पोलिसांनी सापळा लावून बनावट शाळा सोडल्याचा दाखला देताना आरोपी राहूलला रंगेहाथ पकडले.

त्याच्याजवळील बॅगची पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्यामध्ये  बनावट शाळा सोडल्याचे दाखले व शाळेचे बनावट शिक्के मिळुन आले. आरोपीच्या घराची, ऑफीसची झडती घेतली घेतल्यानंतर बनावट शिक्के तयार करण्याचे मशिन, कॉम्प्युटर, प्रिंटर, 44 बनावट शिक्के काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे. तर आरोपी नितीनला पुण्यातील दत्तवाडी येथून अटक केली असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे 20 गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, आरोपींकडे चौकशी केल्यानंतर आरोपी राहुल शिंदे याचे आनंदनगर, चिंचवडमध्ये ई सेवा केंद्र होते. ते कोरोना कालावधीमध्ये बंद होते. त्यामुळे त्याची उपासमार होवू लागल्याने नितीन वहाळकर याने त्याला पैशांसाठी  बनवाट कागदपत्रे बनवण्यास प्रवृत्त केले होते.

ही कामगिरी मा. श्री. कृष्ण प्रकाश सो.. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो. अप्पर पोलीस आयुक्त, मा. मंचक इप्पर पोलीस उपायुक्त परिमंडळ- १, मा श्री. डॉ. सागर कवडे साो. सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग श्री. भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र कदम पोलीस निरीक्षक (गुन्हे), नितीन लांडगे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री रविंद्र भवारी, पोलीस अंमलदार हेमंत खरात, सुष्मा पाटील, धोंडीराम केंद्रे, संतोष महाडीक, प्रभाकर खाडे, स्वामी नरवडे, तुषार वराडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *