Dehugaon News : श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात ‘दिवाळी पहाट अभंगवाणी’ कार्यक्रम

 

Dehugaon News : श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात ‘दिवाळी पहाट अभंगवाणी’ कार्यक्रम
Pckhabar- सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिवाळीमध्ये देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरात दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. आज ( बुधवार) तिसरा दिवशी पहाटे ‘फुलवाले भजनी मंडळाने’ दिवाळी पहाट अभंगवाणी कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

मंदिरात भक्तांची आणि श्रोत्यांची भरपूर गर्दी होती. सर्व अभंगाच्या भक्तीत रमून गेले आणि सर्वांनी कौतुक ही केले.

या कार्यक्रमामध्ये विष्णु महाराज सुर्वे, डी एस चेंडके, चंद्रशेखर माळी, कुमार विजय सुर्वे, कु रेणुका विष्णू सुर्वे, कु वैष्णवी नवनाथ गायकवाड, कु प्रतिक्षा शिंदे यांनी अतिशय सुरेख भजने गायली. सर्व श्रोत्यांनी टाळ्या वाजवून भजनी मंडळ आणि लहान मुलांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *