Talegaon Dabhade Crime News : शाळा चौकात कारची काच उघडी राहिल्याने चोरट्यांनी साधला डाव



कारमधील साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला
Pckhabar-कारची काच अथवा दरवाजा उघडा राहिल्याने चोरट्यांनी डाव साधून कारमधील लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम असा 3 लाख 40 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकात सोमवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसात दरम्यान घडली.

करण राजकुमार कर्नावत (वय-35, रा बालेवाडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कर्नावत यांनी सोमवारी दुपारी तळेगावातील शाळा चौकात (एमएच-14, ईवाय 8445) ही चारचाकी पार्क केली होती. त्यांच्याकडून कारची काच अथवा दरवाजा उघडा राहिला होता. याचा फायदा घेऊन चोरट्याने 25 हजारांचा लॅपटॉप, 15 हजारांचा मोबाईल, तीन लाखांची रोख रक्कम असा 3 लाख 40 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच महत्वाची कागदपत्रे, लॉकरच्या चाव्या, दोन पेन ड्राईव्हही चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी अधिक तपास करत आहेत.








Leave a Reply