जवानांची एकता फेरी देशवासियांसाठी उर्जा देणारी ठरेल’


Talegaon Dabhade News : केरळ ते गुजरात या 2100 किमी अंतराच्या केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांची एकता फेरी देशवासियांसाठी उर्जा देणारी ठरेल, असा विश्वास पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.
त्रिवेंद्रम ते तळेगाव दाभाडे हे सुमारे 1600 किमी चे अंतर पार करून आलेल्या जवानांच्या सायकल फेरीला मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते बुधवारी हिरवा झेंडा दाखवून मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यावेळी झालेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
खासदार बारणे म्हणाले, की देशाची अंतर्गत सुरक्षा राखण्याकामी केंद्रिय आणि राज्यातील पोलीसांचे योगदान मोलाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या भूमितून एकतेचा संदेश घेऊन जाणारी सायकल फेरी गुजरात येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ होणार्या राष्ट्रीय एकता दिन परेड दरम्यान एकतेचा संदेश पोचवेल.
यावेळी व्यासपीठावर सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक डी.एल. गोला, बटालियन कमांडट पारसनाथ आणि सीआयएसएफचे असिस्टन कमांडट अर्चित खेतान, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना मोरे, माऊली घोरगे, एमडीएमएचे अमीन खान, प्रदीप टेकवडे आदि मान्यवर उपस्थित होते. केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाचे सह कमांडंट अर्चित खेतान यांनी आभार मानले.










Leave a Reply