Bhosari Crime News : व्यावसायिकाकडे खंडणी मागणार्‍या दोघांना अटक

Bhosari Crime News : व्यावसायिकाकडे खंडणी मागणार्‍या दोघांना अटक


Pckhabar- हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ, धक्काबुक्की करत कोयते हवेत फिरवून 10 हजार रूपयांची खंडणी मागणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी दुपारी भोसरी एमआयडीसीमध्ये घडली.
मयुर थोरात, दत्त्ता खंडागळे (दोघेही रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भाविक सुभाष शहा (वय-32, रा. खडकी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भोसरी एमआयडीसीमध्ये गोकूळ हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलसमोर येऊन आरोपींनी   फिर्यादी व त्यांच्या चुलत भाऊ विक्रम यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. कोयते हवेत फिरवून त्यांच्याकडे 10 हजार रूपयांच्या खंडणीची मागणी करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *