

Pimpri News : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची हजेरी
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली असून विरोधात असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या कारभाराविरोधात आक्रमक होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही अनेक आजी-माजी नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शिरूर लोकसभा मतादर संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानक हजेरी लावत नागरिकांच्या कक्षात बसून सभागृहात पक्षाचे नगरसेवक विरोधात बोलतात की नाही हे पाहण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी ’वॉच’ ठेवला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरेही उपस्थित होते.
महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्याची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात लागू शकते.










Leave a Reply