Bhosari News : प्रीतम प्रकाश महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम ए, बी ए व बी काॅम अभ्यासक्रमांच्या केंद्राला मान्यता

Bhosari News : प्रीतम प्रकाश महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम ए, बी ए व बी काॅम अभ्यासक्रमांच्या केंद्राला मान्यता


Pckhabar- भोसरी येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात सन 2015 पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र आहे. त्यामध्ये एमबीए , एम कॉम व एम.ए. मराठी या अभ्यासक्रमास मान्यता आहे. या वर्षी नव्याने एम ए ( अर्थशास्त्र, इंग्रजी ,लोकप्रशासन ) , तसेच बी ए आणि बी काॅम या अभ्यासक्रमास विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे.

या अभ्यासक्रमामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या भोसरी व इतर भागातील अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय होणार आहे. हे अभ्यासक्रम मिळविण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे निवृत्त सहसंचालक उत्तमराव जाधव व संस्थेचे अध्यक्ष डाॅ. अशोककुमार पगारिया यांचे मार्गदर्शन लाभले.

प्राचार्य सदाशिव कांबळे, केंद्र संयोजक प्रा. पांडुरंग भास्कर , केंद्रसहाय्यक प्रा. प्रशांत रोकडे हे अभ्यासक्रमाचे कामकाज पाहत आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोककुमार पगारिया यांनी केले आहे.
प्रवेशासाठी संपर्क क्रमांक ९१४५५५६९२०/९०११०६९२५५ ऑफिस नंबर ७७५८९८१९२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *