Pimpri News : केंद्र सरकारविरोधातील सायकल मार्चचे काँग्रेसकडून स्वागत

Pckhabar-केरळ राज्य ते संसद भवन, दिल्ली असा प्रवास सायकल वरून करत केंद्र सरकारविरोधात संघर्षाची यात्रा करत निघालेल्या दोन युवकांचे स्वागत व सन्मान पिंपरी चौक येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
पेट्रोल,डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी विरोधात तसेच महिला, दलित, अल्पसंख्यांकां व उपेक्षित वर्गावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हि सायकल यात्रा करण्यात येत आहे.
केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यातील युवक काँग्रेस चे नेते राफी कोल्लम, युवक काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस सी. विष्णू पलाक्कड हे दोन युवक या सायकल यात्रेत सहभागी झाले आहेत.
ते आज १५०० कि.मी. प्रवास करून पुढे रवाना होत आहे.
या प्रसंगी काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबूद्दीन शेख, मोईन पूना, ॲड.करीम पूना, कबीर मोहम्मद, अश्रफ पंजा, ईक्बाल कसिनो आदि उपस्थित होते.






Leave a Reply