Nigdi News : सीए इन्स्टिट्यूटतर्फे नवोदित सीएंचा गौरव

Pckhabar- येथील दि इंस्टीट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट ऑफ़ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने सनदी लेखापाल परीक्षेत यशस्वी झालेल्या नवोदित शंभर सीएंचा गौरव करण्यात आला.
दी कॉसमॉस को – ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, एशियन ओशियन स्टॅंडर्ड सेंटर्स ग्रुपचे अध्यक्ष सीए शिवाजी झावरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सी ए चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष तथा अध्यक्ष सीए विद्यार्थी संघटना विजयकुमार बामणे, सचिव आणि खजिनदार सीए शैलेश बोरे, माजी अध्यक्षा सी ए सिमरन लीलवानी, माजी अध्यक्ष सी ए संतोष संचेती, समिती सदस्य सीए पंकज पाटणी, सी ए सचिन बन्सल, माजी अध्यक्ष सी ए सुनील कारभारी,सी ए बबन डांगळे, सी ए प्रसाद सराफ,सी ए सुहास गार्डी, सी ए रवींद्र नेर्लीकर,सी ए किशोर गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सीए झावरे व सीए काळे यांनी नवोदित सीएंना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन प्रतिमा भिसे यांनी केले तर
आभार प्रदर्शन पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सी ए चंद्रकांत काळे यांनी मानले.










Leave a Reply