Pimpri Crime News : जुन्या भांडणातून टोळक्याची तरूणाला जबर मारहाण

Pckhabar- जुन्या भांडणातून तरूणाला सहा जणांच्या टोळक्याने डोक्यावर, मानेवर, पाठीमध्ये लाथाबुक्यांनी, लोखंडी कड्याने जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता प्राधिकरण येथे घडली.
सौरभ सुभाष बोराडे (वय-19, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मकरंद चौगुले ऊर्फ मक्या (रा. आकुर्डी), सुरज घोडे, आयुष सोनवणे, अजय जाधव अन्य दोन अनोळखी तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ आणि आरोपी यांचत पुर्वी भांडणे झाली होती. याच भांडणातून सौरभ हा प्राधिकरण येेथे थांबला असता दुचाकीवरून आलेल्या सहा आरोपींनी डोक्यावर, मानेवर, पाठीमध्ये लाथाबुक्यांनी, लोखंडी कड्याने जबर मारहाण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.






Leave a Reply