Pimpri Political News : ज्येष्ठ नेते शरद पवार आजपासून दोन दिवस शहर दौऱ्यावर

Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार आजपासून दोन दिवसांसाठी पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी लक्ष घातले आहे. तर स्थायी समितीच्या लाचखोरी प्रकरणानंतर भाजपच्या राज्य पातळीवर नेत्यांनी काही प्रमाणात दुर्लक्ष केले आहे.
खासदार पवार हे आज (शनिवार) शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे शहरात आगमन होणार आहे. त्यानंतर ते पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयालात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ते पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख स्थानिक नेते, माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना एका बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. ही बैठक सिझन बेंक्वेट हॉल येथे होणार आहे.
उद्या (रविवार) दुपारी साडेतीन वाजता रहाटणी येथील थोपटे लाॅन्स येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही ते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधीपक्ष नेता राजू मिसाळ, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आझम पानसरे, नाना काटे, अजित गव्हाणे, फजल शेख, वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे आदी उपस्थित राहणार आहेत.






Leave a Reply