IPL News : चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल विजयाचा चौकार!

कोलकाता नाईट रायडर्सचा केला पराभव

Pckhabar- दुबई येथे झालेल्या आयपीएलच्या किताब चेन्नई सुपर किंग्स संघाने चौथ्या वेळेस आपल्या नावावर केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या कर्णधार पदाची जादू क्रिडा रसिकांना पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयान माॅर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम बाॅलिंगचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या फाफ् डुप्लेसीने केलेल्या दमदार 86 धावांच्या जोरावर 20 ओवर्समध्ये तीन बाद 192 धावा केल्या होत्या.
बॅटिंगला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीर शुभमन गील आणि व्यंकटेश अय्यरने दमदार अर्धशतक झळकावत 90 धावांची भागीदारी केली. मात्र, शार्दूल ठाकूरने अय्यरला रवींद्र जडेजा करवी झेलबाद करून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. त्यांनतर नितीन राणा, सुनील नरेन लागोपाठ बाद झाल्याने कोलकाता नाईट रायडर्सचा संघ दबावाखाली गेला.
त्यानंतर गोलंदाज लकी फर्ग्युसन आणि शिवम मावीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोलकाता नाईट रायडर्स संघाने 9 बाद 165 धावा केल्या. अखेर चेन्नई सुपर किंग्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत आयपीएलमध्ये विजयाचा चौकार मारला.






Leave a Reply