Good News : शहरातील 21 लाख नागरिकांचे लसीकरण !


Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारअखेर 21 लाख 7 हजार 947 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रार्दूभाव कमी होत असल्याने सध्यस्थितीत लस उपलब्ध असतानाही नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरत आहेत. मात्र, कोरोनाचा प्रार्दूभाव कमी झाला असला तरी नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात मंगळवारी 96 नवीन रूग्ण सापडले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 1 रुग्णांचा मृत्यू झाला.
शहरातील 2 लाख 74 हजार 961 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 869 सक्रीय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 541 रुग्ण गृह विलगीकरणात असून 328 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 409 घरांना भेटी देऊन 1 हजार 539 नागरिकांचे सर्वेक्षण केले. शहरात 21 लाख 7 हजार 947 जणांचे लसीकरण केले.






Leave a Reply