IPL News : आरसीबी आयपीएलमधून बाहेर झाल्याने विराट कोहली, ए बी डिविलियर्स ढसाढसा रडले


IPL News : आरसीबी आयपीएलमधून बाहेर झाल्याने विराट कोहली, ए बी डिविलियर्स ढसाढसा रडले

Pckhabar- बंगळुरूच्या संघानं यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करावी असे अनेक क्रीडारसिकांचे स्वप्न होत. संघ चांगली कामगिरी करत असतानाच आरसीबीच्या संघाला सोमवारी पराभवाचा धक्का बसला. कोलकाताच्या संघाने एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा पराभव करत विराटचा स्वप्नभंग केला.

कर्णधार म्हणून संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्याचं विराटचे स्वप्न अपूर्ण राहिल आहे. आयपीएलमध्ये त्याची कर्णधार म्हणून असणारी कारकिर्द एका अर्थी अपयशाच्या वळणावर येऊन थांबली आणि या साऱ्याचं दु:ख विराटच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागलं होतं.

सामना संपल्यानंतर इतर खेळाडूंशी संवाद साधत असताना विराट ढसाढसा रडला. यावेळी ए बी डिविलियर्सलाही त्याचे अश्रू रोखता आले नाहीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *