Mumbai News: शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, ठिकाण ठरले!


Mumbai News: शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, ठिकाण ठरले!

Pckhabar-कोरोना संकटामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा ऑनलाईन पद्धतीने मेळावा पार पडला होता. यावर्षी कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शिवसेनेचा दसरा मेळावा नियम आणि संकेत पाळून साजरा करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली असून मुंबई सायनच्या षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा पार पडणार आहे. 50 टक्क्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार असून सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाचा प्रार्दूभाव कमी होत असल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असे सांगत दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *